हेलिकॉप्टर अपघातात 3 लष्करी अधिकाऱयांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

कोलकता- पश्चिम बंगालमधील सुकना येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन तीन अधिकाऱयांचा मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरला सुकना येथे 11.45 वाजता अपघात झाला. या अपघातात तीन अधिकाऱयांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमी अधिकाऱयाची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुकना येथील लष्कराच्या परिसरामध्ये हेलिकॉप्टरमधून अधिकारी नियमित सराव करत होते. यावेळी हा अपघात झाला

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील नागरोटा येथे मंगळवारी (ता. 29) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जवान हुतात्मा झाले होते. यामध्ये दोन अधिकाऱयांचा समावेश होता. या घटनेनंतर दुसऱयाच दिवशी लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन तीन अधिकाऱयांचा मृत्यू झाला आहे.