तीस टक्के भारतीय दरिद्रीनारायण

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक गरीब

नवी दिल्ली - जागतिक बॅंकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक गरीब लोक भारतामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. २०१३ मध्ये दारिद्य्ररेषेखाली असणाऱ्या लोकसंख्येच्या आकडेवारीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. या आकडेवारीनुसार ३० टक्के गरिबांची लोकसंख्या भारतात आहे.

‘पॉवर्टी अँड प्रॉस्पेरिटी’ नामक अहवालात जागतिक बॅंकेने भारतातील सद्यःस्थितीच्या गरिबीचे विवेचन केलेले आहे. वैश्‍विक अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना मिळत असून, विविध देशांची अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतामध्ये १.९० डॉलर अर्थात जवळपास १२० रुपयांचे प्रतिदिन उत्पन्न असणारी तीस टक्के लोकसंख्या दारिद्य्ररेषेखालील जीवनाचे चटके सोसत आहे. नायजेरियामध्ये आठ कोटी साठ लाख गरीब आहेत. भारतानंतर सर्वाधिक गरीब नायजेरियामध्ये आहेत. जगातील सर्वाधिक गरीब लोक सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागामध्ये असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

जगात ८० कोटी गरीब
जागतिक बॅंकेच्या अहवालानुसार २०१३ च्या जनगणनेनुसार भारतामध्ये २२.४ कोटी गरिबांची लोकसंख्या होती. तर संपूर्ण जगामध्ये एकूण ८० कोटी गरीब आहेत. ही गरिबांची संख्या २०१२ च्या आकडेवारीपेक्षा १० कोटींनी कमी आहे.