उत्तरप्रदेश, झारखंड, बिहारमध्ये वादळाचा तडाखा ; 34 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

झारखंडमध्ये 12, बिहारमध्ये 12 तर उत्तर प्रदेशमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. दाक्षिणात्य भाग असलेल्या केरळमध्ये अपेक्षित कालावधीपूर्वीच मान्सून येणार असल्याने या वादळाचा तडाखा बसत आहे.

तिरुअनंतपुरम : देशातील काही राज्यातील नागरिकांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. झारखंड, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये 48 तासांहून अधिक तास वादळाने थैमान घातले आहे. या वादळामुळे आत्तापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

झारखंडमध्ये 12, बिहारमध्ये 12 तर उत्तर प्रदेशमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. दाक्षिणात्य भाग असलेल्या केरळमध्ये अपेक्षित कालावधीपूर्वीच मान्सून येणार असल्याने या वादळाचा तडाखा बसत आहे. बिहारमधील पेखा गावात झाड कोसळल्याने येथील तिघांचा मृत्यू झाला. परिसरात बचावकार्य सुरु करण्यात आले असून, जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. तसेच झारखंडमधील काही भाग या वादळाचा बळी ठरला आहे. झारखंडमधील 12 जणांचा मृत्यू झाला. 

लक्षद्वीपच्या अमिनी येथे 24 मिमी तर केरळच्या कोन्नी येथे 18 मिमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. तसेच आता बदलत्या हवामानामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे विभागीय संचालक के. संतोष यांनी दिली. 

Web Title: 34 killed in thunderstorms across UP Jharkhand Bihar monsoon hits Kerala