दिल्लीत शिपायाकडून 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

उत्तर दिल्लीतील शाहदरा भागातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. आरोपी विकास हा या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून शिपाई म्हणून काम करत आहे. दुपारी मुलगी वर्गात एकटीच असल्याचे पाहून हे दुष्कर्म केले. या मुलीच्या आईला याबाबत शंका आल्यानंतर बलात्काराबाबतची माहिती उघड झाली.

नवी दिल्ली - दिल्लीतील शाहदरा भागात शनिवारी शिपायाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या 40 वर्षीय शिपायाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील शाहदरा भागातील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला. आरोपी विकास हा या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून शिपाई म्हणून काम करत आहे. दुपारी मुलगी वर्गात एकटीच असल्याचे पाहून हे दुष्कर्म केले. या मुलीच्या आईला याबाबत शंका आल्यानंतर बलात्काराबाबतची माहिती उघड झाली. विकास हा नेहमी टोपी घालत होता. त्यामुळे मुलीने त्याला ओळखले.

गुरुग्राम येथील एका शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून स्कूलबस चालकाला अटक केली होती. गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल या शाळेमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर आता दिल्लीत शाळेतील ही बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.