स्पेक्‍ट्रम लिलावात ५३ हजार कोटींची बोली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

७०० मेगाहर्टज आणि ९०० मेगाहर्टज बॅंडला पसंती

नवी दिल्ली - देशातील सर्वांत महागड्या स्पेक्‍ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी ५३ हजार ५३१ कोटी रुपयांची बोली लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दूरसंचार कंपन्यांनी प्रीमियम बॅंड ७०० मेगाहर्टज आणि ९०० मेगाहर्टज यांच्यासह सर्व फ्रिकवेंसी बॅंड्‌स खरेदी करण्याला प्राधान्य दिले. 

स्पेक्‍ट्रम लिलावातील सर्व बोली दूरसंचार कंपन्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. पाचव्या फेरीमध्ये प्रचालकांनी १८०० मेगाहर्टजच्या स्पेक्‍ट्रम बॅंडला प्राधान्य दिले. ज्याचा वापर २जी, ४जी सेवा देण्यासाठी केला जातो. यानंतर प्रचालकांनी २१०० मेगाहर्टजवर लक्ष्य केंद्रित केले. हे बॅंड ३जी-४जी सेवांसाठी उपयुक्त आहेत. यासोबत २५०० मेगाहर्टज (४जी) बॅण्ड, २३०० मेगाहर्टज (४जी) आणि ८०० मेगाहर्टज (२जी व ४जी) बॅंडची बोलीतही प्रचालकांनी रस दाखविल्याचे चित्र होते. 

भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि रिलायन्स जिओ यांच्यासह इतर कंपन्या ग्राहकांना उच्च दर्जाची इंटरनेट सुविधा व ‘नेक्‍स्ट जनरेशन’च्या मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहेत. या स्पर्धेमध्ये आघाडीवर राहण्यास स्पेक्‍ट्रम खरेदी अत्यावश्‍यक असल्यानेच या लिलावाला महत्त्व आले आहे.