भोपाळ : सिमीच्या फरार 8 दहशतवाद्यांना केले ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित सर्व जण होते. यापैकी तीन जण यापूर्वी खांडवा येथील कारागृहातून पळाले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.​

भोपाळ - भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून रविवारी रात्री फरार झालेल्या सिमी या दहशतवादी संघटनेच्या आठ दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. भोपाळपासून 10 किमी अंतरावरील इंदखेडी गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

दहशतवाद्यांनी रविवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने सुरक्षारक्षक रमा शंकर यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर चादरींचा वापर करून कारागृहाची भिंत पार करून पलायन केले. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शहरात नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच काही पथकेही बनविण्यात आली होती. पोलिसांना फरार दहशतवाद्यांचा माहिती मिळाल्यानंतर त्यांना गोळीबारात ठार मारण्यात आले. अमजद, जाकिर हुसैन सिद्दीकी, मोहम्मद सालिक, मुजीब शेख, मेहबूब गुड्डू, मोहम्मद खालिद, अकील व माजिद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या प्रकरणाचा सविस्तार अहवाल मागविला आहे.

स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित सर्व जण होते. यापैकी तीन जण यापूर्वी खांडवा येथील कारागृहातून पळाले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.