वर्षभरात 82 जवान हुतात्मा; 8 वर्षातील सर्वाधिक संख्या

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

जम्मू : सीमेपलीकडून जम्मू आणि काश्‍मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांदरम्यान सुरक्षा यंत्रणेतील सुमारे 82 जवान व कर्मचारी हुतात्मा झाल्याची माहिती राज्य गृह मंत्रालयाने दिली. मागील 8 वर्षांतील हुतात्मा जवानांची ही सर्वाधिक संख्या आहे. 

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये 85 जवान, तसेच 2009 मध्ये 79 जवान, 2010 मध्ये 69 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर 2011 ते 2012 दरम्यान या संख्या काही प्रमाणात कमी झाली. 2011 मध्ये 33, तर 2012 मध्ये 15 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर 2013 मध्ये ही संख्या 15 वरून थेट 53 वर पोचली. 2014 मध्ये 47, तर 2015 मध्ये 39 जवान हुतात्मा झाले होते. 
2005 मध्ये तब्बल 244 जवान देशाच्या कामी आले. त्याचप्रमाणे 2006 आणि 2007 मध्ये अनुक्रमे 182 आणि 122 सुरक्षा कर्मचारी हुतात्मा झाले होते. 

दरम्यान, जवानांच्या या होतात्म्याबद्दल त्यांना सोशल मीडियावरून अनेक नेटिझन्सनी आदरांजली वाहिली. तसेच, काहींनी नोटाबंदीनंतर 100 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. 
 
Web Title: 82 security personnel killed last year in J-K, highest in 8 years