अखिलेश म्हणजेच समाजवादी पक्ष - रामगोपाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

अखिलेश यादव यांना पक्षातील 90 टक्के आमदार व नेत्यांचा पाठिंबा असल्याचे आम्ही सांगितले आहे. तेच पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सायकल या चिन्हावर आमचाच हक्क आहे.

लखनौ - समाजवादी पक्षातील जवळपास 90 टक्के आमदारांचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पाठिंबा आहे. त्यामुळे खरा समाजवादी पक्ष हा आहे, ज्याचे अखिलेश यादव अध्यक्ष आहेत, असे वक्तव्य अखिलेश यांचे काका व पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील कलह अद्याप शांत झालेला नसून, समाजवादी पक्षाच्या सायकल या चिन्हावरून सध्या वाद सुरु आहेत. अखिलेश यादव यांनी स्वतःला राष्ट्रीय अधिवेशनात अध्यक्ष घोषित केलेले आहे. तर, मुलायमसिंह यादव यांनी राष्ट्रीय अधिवेशन असंविधानिक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चिन्हावरून वाद सुरु असताना आज (मंगळवार) रामगोपाल यादव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन अखिलेश यादवच समाजवादी पक्ष असल्याचे म्हटले आहे.

रामगोपाल यादव म्हणाले, की अखिलेश यादव यांना पक्षातील 90 टक्के आमदार व नेत्यांचा पाठिंबा असल्याचे आम्ही सांगितले आहे. तेच पक्षाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सायकल या चिन्हावर आमचाच हक्क आहे. अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील पक्षालाच समाजवादी पक्ष मानण्यात यावे.

दुसरीकडे आझम खान हे पिता-पुत्रांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही काहीही होऊ शकते. मुलायमसिंह लखनौला येत असून, त्यांच्याशी चर्चा करू, असे आझम खान यांनी म्हटले आहे.

देश

नवी दिल्ली : ब्ल्यू व्हेल गेममुळे केरळ आणि देशाच्या अन्य भागात होणाऱ्या मुलांच्या आत्महत्या पाहता राष्ट्रीय बालहक्क संरक्षण...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती आज आणखी गंभीर झाली असून, राज्यातील पूरबळींची संख्या आता 98 वर पोचली आहे. पुरामुळे 15 जिल्ह्यांतील 93...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कोडाईकॅनल (तमिळनाडू) - मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017