उमेदवार निवडताना खात्री दिली नव्हती: आप

पीटीआय
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचे उमेदवार निवडताना कोणाचीही खात्री दिलेली नव्हती, अशा प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केल्या आहेत. 

वृत्तसंस्थेशी बोलताना जैन म्हणाले, "भारतामध्ये साधारण 120 कोटी लोक आहेत. आम्ही आमच्या पक्षासाठी अत्यंत काळजीपूर्वक मात्र कोणाचीही खात्री न देता उमेदवार निवडल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की चुकीची कृत्ये करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ते त्यांनी सिद्ध केले आहे.‘ आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील निलंबित महिला व बालविकासमंत्री संदीप कुमार यांची एक अश्‍लील सीडी समोर आली आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. याबाबत बोलताना जैन म्हणाले, "ज्या क्षणी केजरीवाल यांना ही बाब समजली त्यानंतर तातडीने अवघ्या 30 मिनिटांत त्यांनी कारवाई केली. ज्याक्षणी आम्हाला सीडी प्राप्त झाली त्याचक्षणी आम्ही कारवाई केली. आम्ही भारतीय जनता पक्षासारखे नाहीत‘ असेही जैन यांनी यावेळी सांगितले.