आपकडून आणखी दोन नावांची घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

आपचे जिल्हा समन्वयक गुरप्रीतसिंग वरैच यांनी या दोघांच्या नावांची घोषणा केली. शेरगिल यांची मोहाली मतदारसंघातून, तर कुदानी यांची सिंगूर जिल्ह्यातील लेहरागागा येथील जागेसाठी निवड करण्यात आली आहे

चंडीगड - आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने (आप) आणखी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून, आता आपच्या एकूण उमेदवारांची संख्या 107 वर पोचली आहे. नरिंदरसिंग शेरगिल (48) आणि जसबीरसिंग कुदानी (41) अशी या उमेदवारांची नावे आहेत.

आपचे जिल्हा समन्वयक गुरप्रीतसिंग वरैच यांनी या दोघांच्या नावांची घोषणा केली. शेरगिल यांची मोहाली मतदारसंघातून, तर कुदानी यांची सिंगूर जिल्ह्यातील लेहरागागा येथील जागेसाठी निवड करण्यात आली आहे. शेरगिल हे एक प्रगतशील शेतकरी असून, त्यांनी सरपंचपदही भूषविले आहे, तर कुदानी हेदेखील व्यवसायाने शेतकरी आहेत. दरम्यान, आपसोबत आघाडी असलेल्या लोक इंसाफ पक्षानेदेखील पाच विधानसभेच्या पाच जागांपैकी चार जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
 

देश

समाजसुधारक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मुस्लिम महिलांच्या घटनात्मक...

03.30 AM

सर्वोच्च न्यायालयालाने तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, फतवे काढणाऱ्या मौलवी, हुरियत...

02.33 AM

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM