'आप' खासदाराने संसदेची सुरक्षा वेशीवर टांगली

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे संगरूर मतदारसंघातील खासदार भगवंत मान यांनी संसदेच्या सुरक्षा नियमांचा भंग केला. मान यांनी स्वतःच्या घरून संसदेत जातेवेळीचा एक संपूर्ण लाइव्ह व्हिडियो क्‍लिप बनवून ती फेसबुकवर शेअर केली आहे. मान यांच्या या लाइव्ह व्हिडियो क्‍लिपने सुरक्षा यंत्रणांची मात्र झोप उडविली आहे. 

या व्हिडिओ क्‍लिपच्या माध्यमातून मान यांनी संसदेची सुरक्षा-व्यवस्था जगासमोर मांडल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. व्हिडिओमध्ये संसदेत कसा प्रवेश होतो, कुठे कुठे वाहनांची तपासणी होते, तपास कसा होतो, तसेच सुरक्षेची काय व्यवस्था आहे, याबाबत सर्व रेकॉर्डिंग मान यांनी केले आहे. संसद सुरक्षेच्या नियमावलीनुसार संसदेच्या आवारात व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. खासदारांनाही व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही. त्यामुळे मान यांच्यावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

88 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ 

मान यांनी फेसबुकवर अपलोड केलेला व्हिडिओ 88 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला. 10 हजारपेक्षा अधिक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आलेल्या आहेत. 778 लोकांनी या व्हिडिओ शेअर केला आहे.