एअर इंडियाच्या अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

एअर इंडिया कंपनीच्या एका एअर होस्टेसने कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर केला आहे. यासंदर्भात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान नरेंद्र यांना तक्रारीचे पत्र पाठवले आहे. याची दखल घेऊन प्रभू यांनी एअर इंडियाच्या सीएमडी यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : एअर इंडिया कंपनीच्या एका एअर होस्टेसने कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर केला आहे. यासंदर्भात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान नरेंद्र यांना तक्रारीचे पत्र पाठवले आहे. याची दखल घेऊन प्रभू यांनी एअर इंडियाच्या सीएमडी यांना या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. वेळ पडल्यास याविषयी एक समितीसुद्धा स्थापन करण्यात येईल. असे आश्वासन प्रभू यांनी दिले आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न हाताळल्यामुळे सुरेश प्रभू आणि नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्याची वेळ आल्याचे एअर होस्टेसने म्हटले आहे. मागील सहा वर्षापासून त्रास दिला जात होता. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण चांगला प्रतिसाद मिळाला नाही. उलट प्रकरण तिथेच दाबून टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता. त्यामुळे नाईलाजाने हे पाऊल उचण्याची वेळ माझ्यावर आल्याचे तिने म्हटले आहे.

Web Title: accused of sexual exploitation on air-India officer