देशद्रोहाच्या आरोपातून वैको यांची निर्दोष मुक्तता

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

चेन्नई - मरुमलार्ची द्रमुक (एमडीएमके) चे सरचिटणीस वैको यांना 2008 मधील एका भाषणात "लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ इलम'बाबत (एलटीटीई) केलेल्या वक्तव्याबद्दल देशद्रोह आणि बेकायदेशीर उपक्रमांना पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून स्थानिक न्यायालयाने आज निर्दोष मुक्त केले. हे न्यायालय वैको यांना निर्दोष मुक्त करत असल्याचा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी भरगच्च न्यायालयात जाहीर केला.

न्यायालयाच्या या निकालानंतर तमीळविरोधी नेता अशी प्रतिमा असलेल्या वैको यांचे समर्थक आणि त्यांच्या वकिलांनी वैको यांचे अभिनंदन केले. श्रीलंकेत तमीळ इलमच्या स्वातंत्र्यासाठी "एलटीटीई' आणि श्रीलंकेचे सैन्य यांच्यात सुरू असलेल्या नागरी युद्धाच्यावेळी 20 ऑक्‍टोबर 2008 रोजी का सभेमध्ये वैको यांनी केंद्र सरकारविरोधी आणि "एलटीटीई'ला पाठिंबा दर्शविणारे वक्तव्य करून भारतीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल तमिळनाडू पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आपण त्या सभेमध्ये फक्त तमिळींची परिस्थिती आणि श्रीलंकेत काय चालले आहे, असे वक्तव्य केले. भारताच्या सार्वभौमत्वाविरोधात नव्हे, असे वैको यांनी न्यायालयास सांगितले. सुनावणीच्यावेळी वैको यांच्या भाषणाची सीडी पुराव्यादाखल न्यायालयात दाखल करण्यात आली होती.