लष्करासाठी देश प्रथम, अग्निवीरांच्या भरतीत कोणताही बदल होणार नाही : जनरल पुरी

Lieutenant General Anil Puri
Lieutenant General Anil Puriesakal
Summary

'उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी नसल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल.'

अग्निपथमुळं (Agneepath Scheme) देशाची सुरक्षा वाढेल, असा दावा करणाऱ्या भाजपसमोर देशाची मालमत्ता वाचवण्याचं संकट पडलंय. सरकारनं अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशातील अनेक राज्यातील युवक आक्रमक झाली आहेत. अग्निपथ योजनेवरून संपूर्ण बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये (Bihar) खळबळ उडाली असून तीन दिवसांपासून देशाच्या विविध भागात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरूय.

त्यातच आज पुन्हा लष्कराकडून (Indian Army) पत्रकार परिषद घेण्यात आलीय. लष्करासाठी देश प्रथम आहे. अग्निवीरांच्या भरतीत कोणताही बदल होणार नाहीय. हा देशभक्तीचा प्रसंग आहे, युवकांनी ही संधी हातातून जाऊ देऊ नये, असं स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी व्यक्त केलंय. सैन्यात सेवा करणं हे देशभक्ती आणि उत्कटतेचं कार्य असल्याचंही ते म्हणाले.

Lieutenant General Anil Puri
विरोधी पक्ष यशवंत सिन्हांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देणार?

लष्करीचे सचिव, लेफ्टनंट जनरल पुरी (Lieutenant General Anil Puri) पुढं म्हणाले, लष्करातील भरती प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाहीय. रेजिमेंट प्रक्रियेतही बदल होणार नाहीय. उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारात सहभागी नसल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. हा आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. अग्निवीर योजनेंतर्गत लष्करातील जुन्या सैनिकांना घरी पाठवलं जाणार असल्याची अफवा काही लोकांकडून पसरवण्यात आली होती. ती पूर्णपणे खोटी माहिती आहे. अग्निपथ योजनेत तीन गोष्टींचा समतोल असणार आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे, सशस्त्र दलातील तरुण सैन्य, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सैन्यात भरती होण्यासाठी पात्र तरुण असा समतोल साधला जाणार असल्याचंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com