गुजरातेत पटेलांना पर्याय 'ओबीसीं'चा

महेश शहा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

भाजपची राजकीय खलबते; काँग्रेसने स्वीकारले "सॉफ्ट हिंदुत्व'

अहमदाबाद : आरक्षणाबाबत गुजरात सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्याने आक्रमक झालेल्या पाटीदार समाजाच्या नेत्यांनी आता सवतासुभा मांडला आहे. पटेल गळाला लागत नसल्याचे लक्षात येताच भाजपनेही अन्य जातीय संघटनांना जवळ करायला सुरवात केली आहे. पक्षाने यासाठी अन्य मागासवर्गीयांची (ओबीसी) मोट बांधायला सुरवात केली आहे. राजकीय पातळीवर प्रथमच पाटीदार भाजपपासून दुरावल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अचानक गुजरातच्या तीनदिवसीय दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बक्‍सी पंच, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि दलित समाजाच्या संघटनांच्या प्रमुखांशी चर्चा केल्याचे समजते. अहमदाबादेत हे बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. "पटेलांनी साथ सोडली तर मागासवर्गीयांना जवळ करा', असे स्पष्ट आदेश प्रदेश कार्यकारिणीस देण्यात आले आहेत. काँग्रेसने मात्र याचा फायदा उठवायला सुरवात केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी "सॉफ्ट हिंदुत्व' स्वीकारत बड्या मंदिरांना भेटी दिल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. राहुल यांनी राजकोटमधील पाच मंदिरांना भेटी दिल्या आहेत. यातील एक मंदिर हे जलाराम बाप्पांचे तर दुसरे खोडल धाम हे होते. जलाराम बाप्पा हे सौराष्ट्रातील पाटीदारांचे दैवत आहे.

द्वारकाधीशाचे दर्शन
राहुल यांनी द्वारकाधीश मंदिरातील श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरवात केली होती. चोटिला येथील मंदिरातील एक हजार पायऱ्या चढत राहुल यांनी येथील मंदिरात पूजाअर्चा केली होती. जामनगरमधील मॉं अंबा मंदिरासही त्यांनी भेट दिली होती. "ओबीसी' नेते अल्पेश ठाकूर हे पुढील महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.