"एअर इंडिया'ने मागितली माफी

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

जगन्नाथ मंदिरातील पाकगृहात दररोज एक लाखांपेक्षाही अधिक लोकांसाठी येथे भोजन तयार केले जाते. यामध्ये 285 पेक्षा अधिक शाकाहारी आणि मांसाहरी पदार्थ तयार केले जातात असा दावा नियतकालिकातील लेखामध्ये करण्यात आला होता

भुवनेश्‍वर -  विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाने आपल्या ईनफ्लाइट नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाबद्दल माफी मागितली आहे. प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरामध्ये मांसाहारी पदार्थदेखील वाटले जातात, असा दावा या लेखामध्ये करण्यात आला होता. "शुभ यात्रा' या नियतकालिकामध्ये "डिव्होशन कॅन बी डेलिशियस' या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता.

जगन्नाथ मंदिरातील पाकगृह हे जगातील सर्वांत मोठे आहे. या पाकगृहात पाचशे आचारी, तीनशे सहायक काम करतात. दररोज एक लाखांपेक्षाही अधिक लोकांसाठी येथे भोजन तयार केले जाते. यामध्ये 285 पेक्षा अधिक शाकाहारी आणि मांसाहरी पदार्थ तयार केले जातात असा दावा नियतकालिकातील लेखामध्ये करण्यात आला होता.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही याची गांभीर्याने दखल घेत ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत संबंधित यंत्रणा कंपनीवर कठोर कारवाई करेल, असे म्हटले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री अशोक पांडा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, तसेच जगन्नाथ सेनेच्या कार्यकर्त्यांनीही या विरोधात आंदोलन केले होते. पांडा यांनी मात्र संबंधित कंपनी ही केंद्राच्या अखत्यारित येत असल्याने राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

 

Web Title: air india finally apologizes