बहुमताऐवजी भाजपची आता युतीची भाषा

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

अखिलेश यांचे टीकास्त्र; वस्तुस्थिती तपासण्याचे आव्हान

आझमगड: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या 403 जागांपैकी 300 जागा मिळण्याचा दावा करणारे आता युतीच्या सरकारची भाषा बोलू लागले आहेत. मोदी आझमगड येथे आले नाहीत, कारण या जिल्ह्यातील सर्व दहा जागा समाजवादी पक्ष जिंकणार असल्याचे त्यांना माहिती आहे, असे अखिलेश यांनी येथील प्रचारसभेत सांगितले.

समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) हे बहुमताचा पोकळ दावा करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी महू येथील प्रचार सभेमध्ये म्हटले होते, तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत न मिळाल्यास बसपने विनाअट पाठिंब्याचा आणि उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा विचार करावा, असे रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अखिलेश म्हणाले, ""कोणतेही भाष्य करण्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती तपासली पाहिजे. ही निवडणूक राज्याच्या भवितव्यासाठी होत असून, लोकांचे भवितव्यही त्यावर अवलंबून आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान कार्यक्रम घेत आहेत, तेथे लोकांसाठी त्यांनी काय केले ते सांगावे. या राज्यासाठी गेल्या तीन वर्षांत त्यांनी काही केलेले नाही.'' नोटाबंदीनंतर जो काळापैसा उजेडात यायला हवा, तो केंद्र सरकार लपवत आहे. नोटाबंदीबाबत पंतप्रधान आणि भाजप लोकांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.

Web Title: Akhilesh Yadav's attack on bjp