CRPFसह शोकाकूल निमलष्करी दलांची यंदा होळी नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

नवी दिल्ली : छत्तीगढमधील सुकमा जिल्ह्यात मारल्या गेलेल्या 12 CRPF जवानांना आदरांजली म्हणून सर्व निमलष्करी दलांच्या कर्मचाऱ्यांनी यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : छत्तीगढमधील सुकमा जिल्ह्यात मारल्या गेलेल्या 12 CRPF जवानांना आदरांजली म्हणून सर्व निमलष्करी दलांच्या कर्मचाऱ्यांनी यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'कोणत्याही ठिकाणी रेजिमेंटच्या वतीने आयोजित करण्यात येणारे होळीशी संबंधित कोणतेही कार्यक्रम करण्यात येणार नाहीत,' असे आदेश केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) दिले आहेत. 
तसेच, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), सीमा सुरक्षा दल (BSF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), सशस्त्र सीमा दल (SSB) अशा अन्य निमलष्करी दलांनीही देशातील सर्वांत मोठ्या निमलष्करी दल असलेल्या CRPFच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे. तेही त्यांच्याशी संबंधित कोणत्याही कार्यालयात होळी साजरी करणार नसल्याचे सांगितले. 

"सर्व सैनिक खांद्याला खांदा लावून सुकमा येथील हुतात्मा जवानांसोबत उभे राहिले त्याबद्दल महासंचालक अत्यंत कृतज्ञ आहेत. कर्तव्यदक्षता हाच CRPFचा एकमेव धर्म आहे," असे CRPFने ट्विटमध्ये म्हटले आहे.