महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 जून 2017

काँग्रेस हा पक्ष तत्वावर आधारलेला नाही. काँग्रेसची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी करण्यात आली होती. गांधींना पक्षाचे भवितव्य माहीत होते. याच्या उलट भाजपचा दृष्टीकोन असून, जो देशविरोधी घोषणा देईल, त्याला देशद्रोही ठरविण्यात येईल.

रायपूर - काँग्रेस पक्ष हा तत्वावर आधारलेला पक्ष नसून, देशाला स्वातंत्र्य मिळावे या उद्धिष्ठासाठी या पक्षाची स्थापना केला होती. महात्मा गांधी हे चतुर बनिया (चतुर व्यापारी) होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.

छत्तीसगडमधील रायपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते छत्तीसगडच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी काँग्रेस पक्षाबद्दल स्पष्टीकरण देताना महात्मा गांधींचा उल्लेख चतुर बनिया असा केला. या वक्तव्यावरून वाद होण्याची चिन्हे असून, काँग्रेसकडून अमित शहा यांना लक्ष्य करण्यात येत आहे. 

अमित शहा म्हणाले, की काँग्रेस हा पक्ष तत्वावर आधारलेला नाही. काँग्रेसची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी करण्यात आली होती. गांधींना पक्षाचे भवितव्य माहीत होते. याच्या उलट भाजपचा दृष्टीकोन असून, जो देशविरोधी घोषणा देईल, त्याला देशद्रोही ठरविण्यात येईल. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठीच काँग्रेस हे साधन होते. या चळवळीत डाव्यांपासून, उजवे, समाजवादी आणि विविध विचारधारा असलेले लोक सहभागी झाले होते. ही स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीची एक चळवळ होती. पुढे काय होणार आहे हे महात्मा गांधींना माहिती होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस बरखास्त करण्याची म्हटले होते. पण, तसे झाले नाही. आता काही जण ते बरखास्त करत आहेत. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती​

'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार
जिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय