श्रीनगर विमानतळावर ग्रेनेडसह जवानाला अटक

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

या जवानाच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यानेच त्याला ग्रेनेड दिले. मात्र, पोलिसांना त्याच्या वक्तव्यावर संशय आहे. भूपाल मुखिया असे या जवानाचे नाव असून, तो पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा आहे.

श्रीनगर - बॅगमध्ये दोन ग्रेनेड घेऊन जाणाऱ्या भारतीय लष्करातील जवानाला आज (सोमवार) सकाळी श्रीनगर विमानतळावर अटक करण्यात आली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) उरी सेक्टरमध्ये तैनात असलेला हा जवान आज सकाळी श्रीनगरहून दिल्लीला विमानाने निघाला होता. त्याच्या बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन ग्रेनेड आढळून आले. यानंतर या जवानाला अटक करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

या जवानाच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यानेच त्याला ग्रेनेड दिले. मात्र, पोलिसांना त्याच्या वक्तव्यावर संशय आहे. भूपाल मुखिया असे या जवानाचे नाव असून, तो पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा आहे. उरी सेक्टरमध्ये 17 जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये तो कार्यरत आहे.

Web Title: Army jawan arrested with two grenades at Srinagar airport