पाकच्या गोळीबारात आणखी एक जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

जम्मू - जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील मंजाकोट आणि गंभीर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) पहाटेपासून पाकिस्तानी सैन्याकडून सतत भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येत होता. या गोळीबारात भारताचा एक जवान हुतात्मा झाला आहे. उधमपूर जिल्ह्यातही पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले असून, त्यांना उधमपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले होते. यातील एका जवानाची दहशतवाद्यांना विटंबना केल्याचेही समोर आले होते. भारतीय जवानांनी पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.

Web Title: Army jawan dies in fresh ceasefire violation by Pakistan