आसाराम प्रकरणी स. न्यायालयाकडून गुजरात सरकार धारेवर...

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

आसाराम बापु हे बलात्काराच्या आरोपांतर्गत गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात आहेत; मात्र अद्यापी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीची चौकशी झाली नसल्याचे आढळून आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला. पीडित तरुणीची अद्यापी चौकशी न करण्याचे कारण काय, अशी थेट विचारणा न्यायालयाकडून गुजरात राज्य सरकारला करण्यात आली आहे

नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणी अटकेत असलेले अध्यात्मिक गुरु आसाराम बापु यांच्याविरोधातील खटला मंद गतीने चालविला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च्च न्यायालयाने गुजरात राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

आसाराम बापु हे बलात्काराच्या आरोपांतर्गत गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात आहेत; मात्र अद्यापी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीची चौकशी झाली नसल्याचे आढळून आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून संताप व्यक्त करण्यात आला. पीडित तरुणीची अद्यापी चौकशी न करण्याचे कारण काय, अशी थेट विचारणा न्यायालयाकडून गुजरात राज्य सरकारला करण्यात आली आहे.

76 वर्षीय आसाराम बापु हे एका 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑगस्ट 2013 पासून तुरुंगात आहेत. यानंतर आसाराम व त्यांचे पुत्र नारायण साई या दोघांवर दोन बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणीही गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणीही गांधीनगर येथील न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणी अधिक वेळ न दवडण्याची तंबी न्यायालयाकडून गुजरात राज्य सरकारला देण्यात आली आहे.