गुजरातमधील जवान हुतात्मा का होत नाहीत: अखिलेश

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

हुतात्मा जवान, वंदे मातरम, राष्ट्रवादावर राजकारण करण्यात येत आहे. ते आम्हालाही हिंदू समजत नाहीत. हिंदू असण्याची व्याख्या काय आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील राज्यांतील अनेक जवान हुतात्मा झाले आहेत. पण, गुजरातमधील एकही जवान हुतात्मा का होत नाही, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.

दहशतवादी, नक्षलवादी कारवायांमध्ये लष्कराचे, सीआरपीएफ आणि पोलिस दलातील जवान हुतात्मा होत आहेत. देशातील विविध राज्यांतील हे जवान हुतात्मा होत असतात. यामध्ये फक्त गुजरातमधील जवानांचा समावेश नसतो, असा प्रश्न अखिलेश यादव यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील असल्याने या वक्तव्यावर वाद होण्याची शक्यता आहे.

अखिलेश यादव म्हणाले, की हुतात्मा जवान, वंदे मातरम, राष्ट्रवादावर राजकारण करण्यात येत आहे. ते आम्हालाही हिंदू समजत नाहीत. हिंदू असण्याची व्याख्या काय आहे.