'आयजीं'सह 17 पोलिस अधिकाऱ्यांचे फेक अकाउंट तयार करणारा अटकेत

Assam man creates fake Facebook profiles of 17 police officers
Assam man creates fake Facebook profiles of 17 police officers

गुवाहटी : एका 30 वर्षीय तरुणाने आसामच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केल्याचे समोर आले. या तरुणाने राज्यातील 17 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट तयार केले असून, खुद्द पोलिस महासंचालक कुलाधार सायकिया आणि गुवाहटीचे पोलिस आयुक्त हिरेन नाथ यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. याप्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली.

गुवाहटी पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुलेमान इब्राहिम अली याला काल (शनिवार) अटक केली. याबाबत पोलिस आयुक्त नाथ यांनी सांगितले, की भारतीय पोलिस सेवेतील 17 अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करण्यात आले असल्याचे समजल्यानंतर त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले. अली याच्या मोबाईलवरून राज्यातील आणि राज्याबाहेरील अशी 17 फेसबुक अकाउंट ऑपरेट केल्याचे सांगितले. अलीने फक्त गमतीमध्ये हे केले, अशी त्याने कबुली दिली. तसेच त्याने हे बनावट अकाउंटच्या माध्यमातून स्वत:ला अकाउंटमध्ये अॅड केले, असे नाथ यांनी सांगितले. 

दरम्यान, अली हा राज्य सरकारमधील माजी अधीक्षक अभियंत्याचा मुलगा असून, अली सध्या बेरोजगार आहे. त्याने 17 पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यापैकी 6 फेसबुक अकाउंट त्याच्याच नावावर असल्याचे तपासात समोर आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com