अॅट्रॉसिटी कायदा संशोधन करून मजबूत केला : राजनाथसिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनेकांनी राग व्यक्त केला असून, त्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. 'भारत बंद'दरम्यान झालेल्या हिंसाचारात 8 नागरिकांनी आपला जीव गमावला. या बंददरम्यान पोलिस आणि निषेध करणाऱ्या लोकांसोबत प्रचंड हिंसाचार माजला होता. या बंददरम्यान जीव गमावलेल्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो''.

- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याला बोथट केलेले नाही. तर २०१५ मध्ये यावर संशोधन करुन हा कायदा आणखी मजबूत केला. याशिवाय आरक्षण संपवण्याबाबतही अफवा पसरवली जात आहे, असे आरोप केले जात आहेत. मात्र, हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत दिलेल्या निवदेनात राजनाथसिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनेकांनी राग व्यक्त केला असून, त्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. 'भारत बंद'दरम्यान झालेल्या हिंसाचारात 8 नागरिकांनी आपला जीव गमावला. या बंददरम्यान पोलिस आणि निषेध करणाऱ्या लोकांसोबत प्रचंड हिंसाचार माजला होता. या बंददरम्यान जीव गमावलेल्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो''. तसेच यातील बाधितांना नुकसान भरपाई वाढविण्यात आली आहे. मागासवर्गीय समुदायाबाबत सरकार संवेदनशील आहे. 

यावर राजनाथसिंह म्हणाले, सोमवारी झालेल्या भारत बंददरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजला होता. आठ नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील सहा आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने अॅट्रॉसिटी कायदा बोथट केला नाही. तर २०१५ मध्ये यावर संशोधन करुन हा कायदा आणखी मजबूत केला. याशिवाय आरक्षण संपवण्याबाबतही अफवा पसरवली जात असल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र, हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. 

Web Title: Atrocity Act will be strong says Union Home Minister Rajnath Singh