पोपट शोधून देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस

पीटीआय
सोमवार, 30 जानेवारी 2017

बेपत्ता पोपट परत मिळविण्यासाठी संबंधित महिला आपल्या जिवावर उदार झाली असून, पोपट शोधून देण्यासाठी तिने मदतीचे आवाहन करणारी पत्रके वितरित केली आहेत

 नावडा - पोपट बेपत्ता झाल्याने नावडा येथील एका महिलेने अन्नत्याग केला असून, पोपट शोधून देणाऱ्यास 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बबिता देवी असे या महिलेचे नाव असून, पोपट बेपत्ता झाल्यापासून त्यांनी 3 जानेवारीपासून अन्नत्याग केला आहे, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.

गेल्या आठ वर्षांपासून हा पोपट संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना सकाळी उठवीत होता. त्याचप्रमाणे तो कुटुंबातील सदस्य असल्यासारखाच होता, त्यामुळे तो केवळ पिंजऱ्यापुरता मर्यादित नव्हता, असे या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. बेपत्ता पोपट परत मिळविण्यासाठी संबंधित महिला आपल्या जिवावर उदार झाली असून, पोपट शोधून देण्यासाठी तिने मदतीचे आवाहन करणारी पत्रके वितरित केली आहेत. यासंदर्भातील एक पत्रक एस. एल. सिन्हा महाविद्यालयातील प्राध्यापक बच्चन पांडे यांना मिळाले आहे, असे ते म्हणाले. या महिलेच्या तीन मुलांनी आणि नातेवाइकांनीही व्हॉट्‌सऍपद्वारे पोपट शोधण्याची मोहीम उघडली आहे. त्याचप्रमाणे महिलेने पोपट शोधून देणाऱ्यास 25 हजारांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

टॅग्स

देश

पणजी : पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडील गोव्यातील दावे दिल्ली लवादाकडे हलविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने...

02.06 PM

रायपूर - छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये...

01.48 PM

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल,...

01.15 PM