प्राप्तिकर विभागाची कारवाई सुडापोटी: डी. के. शिवकुमार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

बंगळूर, ता. 4 (पीटीआय) : कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरील प्राप्तिकर विभागाचे छापे आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने कॉंग्रेस नेते संतापले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजकीय सुडापोटी केंद्र सरकार ही कारवाई करत असल्याचे म्हटले आहे. प्राप्तिकर विभागाने आपल्या कारवाईमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) केलेल्या वापरासही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याचा आव आणणाऱ्या भाजप नेत्यांविरोधातच गैरव्यवहाराचे अनेक आरोप आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

गुजरातमधील कॉंग्रेसच्या 44 आमदारांची शाही बडदास्त ठेवणाऱ्या शिवकुमार यांच्यावरच प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केल्याने यामागे राजकीय कारस्थानचा संशयही व्यक्त होतो आहे. प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचे वेळापत्रक पाहता ती राजकीय सुडापोटी झाली असावी, असे म्हणण्यास जागा असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. माझा या कारवाईला विरोध नाही, पण केंद्र सरकार आणि प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा उद्देश चुकीचा आहे, भाजप आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. शिवकुमार या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडतील का? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता सिद्धरामय्या यांनी त्यावर स्पष्ट भाष्य करणे टाळले.