बँका आता तुमच्या दारी : पंतप्रधान

There are no limitations to maintain minimum balance in Post Bank says PM Modi
There are no limitations to maintain minimum balance in Post Bank says PM Modi

नवी दिल्ली : ''एक मेसेज केल्यानंतर पोस्टमन घरी येऊन पैसे जमा किंवा देण्यास येईल. या सेवेच्या माध्यमातून बचत खात्यांमध्ये 4 टक्के व्याजही मिळेल. यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. देशातील 650 जिल्ह्यांमध्ये ही सेवा-सुविधा मिळणार आहे. बँका आता तुमच्या दारी येतील'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात मोठ्या पोस्ट बँकेचे (आयपीपीबी) उद्घाटन करण्यात आले. देशभरात या 'आयपीपीबी'च्या 650 शाखा तर 3250 अॅक्सेस पॉइंट असणार आहेत. देशभरातील 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस 31 डिसेंबरपर्यंत आयपीपीबीशी जोडण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या लोकांचे उदाहरण देत सांगितले, की यापूर्वी ज्या लोकांमागे बँका पळत होत्या. ते लोक आता बँकांच्या मागे फिरणार आहेत. 'आयपीपीबी'च्या माध्यमातून जे लोकं अद्यापही बँकिंग सेवांपासून वंचित होते, अशा सर्वसामान्यांना बँकिंगची दारे खुली होणार आहेत. देशातील अनेकांना अजूनही पोस्ट कार्यालयावर विश्वास आहे. त्यामुळे हे सर्व लक्षात ठेऊन सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. 

दरम्यान, या नव्या सेवेच्या माध्यमातून 'मोबाईल बँक' अस्तित्वात येणार आहे. या सुविधेचा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदींनी स्वत: एक मेसेज करून आपले खाते उघडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com