'कोणत्याही क्षणी' मोहिमांसाठी तयार राहा- हवाई दलप्रमुख

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

नवी दिल्ली : हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी आपल्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवत "कोणत्याही क्षणी' मोहिमांसाठी तयार राहा, अशी सूचना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे पत्र एक महिन्यापूर्वीच पाठविले असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या पत्राला महत्त्व आले आहे. 'सध्याच्या परिस्थितीत आपल्या देशाला असलेला धोका कायम आहे. त्यामुळे अत्यंत अल्प सूचनेवर मोहिमेसाठी तयार राहणे आवश्‍यक आहे. यासाठी सराव करणेही आवश्‍यक आहे,' असे हवाई दलप्रमुखांनी पत्रात म्हटले आहे. 