शाळांनी शुल्क दरपत्रक न लावल्यास कारवाई - एम. जी. दासर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

चिक्कोडी - चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येत असलेल्या शैक्षणिक शुल्काचे दरपत्रक प्रत्येक शाळेबाहेर सक्तीने लावावे. सरकारी नियमानुसारच शुल्क भरुन घ्यावे. अधिक शुल्क भरुन घेवून पालकांची दिशाभूल करु नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा शिक्षण उपसंचालक एम. जी. दासर यांनी दिला.

मंगळवारी (ता.12) ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "काही शिक्षण संस्थांकडून मनमानी शुल्क आकारण्यात येत असल्याच्या लेखी व तोंडी तक्रारी जनतेतून आल्या आहेत. संस्थांच्या या शुल्क वसुलीमुळे पालकांची कोंडी व लुट होत आहे. शिक्षण संस्थांनी मनमानी व दुप्पट शुल्क वसुलीचे प्रकार तातडीने बंद करावेत. शैक्षणिक शुल्काचे दरफलक शाळेबाहेर लावण्यात यावे.' 

ते म्हणाले, 'जिल्हा कार्यक्षेत्रात आठ विभागात पथके नियुक्त करुन खासगी शाळांना भेटी देवून शुल्क वसुलीबाबत चौकशी करण्यात येणार आहे. शुल्क दरपत्रक न लावणाऱ्या शाळांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मनमानी शुल्क आकारणाऱ्या शिक्षण संस्थांवर डेरा व आरटीई कायद्यानुसार कठोर कारवाई होईल. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण व मुलभूत सुविधा देण्यात याव्यात. सरकारी आदेशानुसार टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात यावी. पण या जिल्ह्यात अनेक शाळेत हा नियम पाळला जात नसून त्याचे पालन करण्यासाठी सक्ती करण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांना बॅंक खात्यामार्फत वेतन अदा करणे व सेवा पुस्तक काढणे सक्तीचे आहे. नियम न पाळणाऱ्या शिक्षण संस्थांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.'

Web Title: Belgaum News compulsion of school fee deceleration