अस्वलाच्या हल्ल्यात कौंदलचा शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

खानापूर - अस्वलाच्या हल्ल्यात शेतात कोळपणी करणारा शेतकरी ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. ६) दुपारी अडीचच्या सुमारास कौंदल (ता. खानापूर) शिवारात घडली. गणपती आण्णू पाटील (वय ५८, रा. कौंदल) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पत्नीही किरकोळ जखमी झाल्या आहेत.

गणपती पाटील व त्यांची पत्नी दुपारी गावाजवळ असलेल्या भात शिवारात कोळपणी करत होते. यावेळी जवळच्या जंगलातून अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविला. त्यांनी आरडाओरड करताच अस्वलाने जवळच कोळपणी करणाऱ्या गणपत यांच्यावर चाल केली. अस्वलाने त्यांच्या तोंडाचा चावा घेतला. दोन्ही डोळ्यांनाही गंभीर दुखापत केली. तोपर्यंत पत्नीने आरडाओरडा करताच अस्वल पळून गेले.

शिवारातील लोकही जमा झाले होते. त्यांनी गणपती यांना खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डोकीला गंभीर जखम झालेली असल्याने उपचार सुरु असताना सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Belgaum News farmer dead in Bear attack

टॅग्स