चव्हाणांसह महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना काळी निशाणे दाखविणार

जितेंद्र शिंदे
शुक्रवार, 4 मे 2018

बेळगाव - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना आणि कर्नाटकी राज्यकर्ते मराठी माणसांना सापत्न वागणूक देत असतानाही महाराष्ट्रातील नेते म. ए. समितीविरोधात प्रचारात येत आहेत. त्यामुळे आज बेळगाव आणि खानापुरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस नेत्यांना समिती काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे.

चव्हाण यांच्यासह अमित देशमुख, सतेज पाटील हे नेते बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. समिती विरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रचार करू नये, यासाठी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी गुरुवारी प्रयत्न केले. नेत्यांना भेटून विनंती केली आहे, तरीही काँग्रेस नेते समितिविरोधी प्रचाराला बेळगाव आणि खानापुरात आले तर, काळी निशाणे दाखवून निषेध करण्याचा इशारा युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी दिला आहे.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election