'यूपी'त कन्याजन्मासाठी भाग्यलक्ष्मी योजना

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्याजन्माचे स्वागत करताना गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की 50 हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले. या अंतर्गत "भाग्यलक्ष्मी योजना' सुरू करण्यात येणार आहे. मुलीच्या आईलाही 5100 रुपये मिळणार असून, उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण विभागातर्फे यो योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

योगी सरकारने जनकल्याणाचे अनेक निर्णय शुक्रवारी घेतले. कन्याजन्माच्या स्वागताप्रमाणेच बुंदेलखंडमधील पाणी समस्या सोडविण्यासाठी केन-बेतवा जोडकालवा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे. सरकारी योजनांमध्ये अवास्तव खर्च करू नये, अशी सूचना सिंचन विभागाला देताना निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा आदेश दिला आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने शाळांमध्ये जाऊन तपासणी करण्याचा आहेशही मुख्यमंत्र्यांनी दिला.

रुग्णालयात अचानक भेट, स्वच्छतेवर भर व सर्व गावांमध्ये सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत वीजपुरवठा करण्याची सूचना केली; तसेच ज्या जिल्ह्यातून जास्त तक्रारी येतील तेथील जिल्हा दंडाधिकाऱ्याला जाब विचारला जाईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे.