चालत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

Bihar Crime News
Bihar Crime Newsesakal
Summary

बेतिया भागात एका अल्पवयीन मुलीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे.

बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारण जिल्ह्यातील (Champaran District) बेतिया भागात एका अल्पवयीन मुलीवर बसमध्ये (Bettiah Bus Stand) सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. प्राथमिक अहवालानुसार, पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया भागात अल्पवयीन मुलीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तीन पुरुषांवर आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी शुद्धीवर आली. तिनं बसचा दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. तिथं उभ्या असलेल्या प्रवाशांनी बसचा दरवाजा उघडत पीडितेच्या बचावासाठी पुढं आले. त्यांनी तिला तातडीनं जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय. बेतियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदर (एसडीपीओ) मुकुल पांडे यांनी सांगितलं की, "पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया इथं एका अल्पवयीन मुलीवर बसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप तिघांवर आहे. मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत बसमध्ये सापडली होती. सध्या बस जप्त करण्यात आली असून बसचा चालक आणि सहाय्यक यांना अटक करण्यात आलीय."

Bihar Crime News
मातृत्वाला काळीमा! अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला विकून आईनं खरेदी केला टीव्ही, कुलर

हैदराबादमध्ये 17 वर्षीय मुलीवर पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार

हैदराबादमधील (Hyderabad) एका पबमधून घरी नेण्याच्या नावाखाली एका १७ वर्षीय मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना 28 मे रोजी घडली होती. जेव्हा पीडित महिला ज्युबली हिल्स परिसरात पार्टी करून घरी परतत होती. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी तिच्या मैत्रिणींनी आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी अॅम्नेशिया पबमध्ये गेली होती. काही लोकांनी तिला संध्याकाळी 5.30 वाजता लाल आलिशान कारमध्ये लिफ्ट देण्याची ऑफर दिली, त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com