माजी खासदार शहाबुद्दीन यांची जन्मठेप कायम

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पाटणा उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

पाटणा : ऍसिड हल्ला करून दोन भावांची हत्या करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे बाहुबली नेते आणि माजी खासदार महंमद शहाबुद्दीन यांची जन्मठेपेची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

पाटणा उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

पाटणा : ऍसिड हल्ला करून दोन भावांची हत्या करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे बाहुबली नेते आणि माजी खासदार महंमद शहाबुद्दीन यांची जन्मठेपेची शिक्षा पाटणा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर पाटणा उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाचे न्यायाधीश के. के. मंडल आणि न्यायाधीश संजयकुमार यांनी शहाबुद्दीन यांची याचिका फेटाळून लावली. सिवानच्या विशेष न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शहाबुद्दीन सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. सिवानच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध शहाबुद्दीन यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या हत्येप्रकरणी सिवानच्या विशेष न्यायालयाने 11 डिसेंबर 2015 रोजी शहाबुद्दीन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. येथील व्यावसायिक चंद्रकेश्‍वर प्रसाद ऊर्फ चंदा बाबू आणि कलावती देवी यांची मुले सतीश राज आणि गिरीश राज यांची ऍसिड टाकून 16 ऑगस्ट 2004 रोजी हत्या करण्यात आली होती. चंदाबाबू यांचा तिसरा मुलगा राजीव रोशन हा या हत्येप्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. त्याचीही 2014 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017