लालूप्रसाद यांचा ट्‌विटरवरही 'जलवा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

वीस लाख फॉलोअर्स लाभलेले पहिले बिहारी नेते

पाटणा: बिहारी राजकारणातील बिनधास्त नेते म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा आता सोशल मीडियावर देखील चांगलाच इम्पॅक्‍ट दिसून येत आहे. लालूंच्या ट्‌विटरवरील फॉलोअर्सची संख्या 20 लाखांवर पोचली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्‌विटरवर फॉलोअर्स मिळणारे लालूप्रसाद हे बिहारमधील पहिलेच नेते ठरले आहेत. "टू मिलेनियअर क्‍लब'मध्ये प्रवेश होताच लालूंनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. लोकांनी मला दिलेला पाठिंबा आणि प्रेमाबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विविध गैरव्यवहारांतील सहभागामुळे तपास संस्थांच्या चौकशीचा मागे लागलेला ससेमिरा, विरोधकांकडून सातत्याने होणारे हल्ले यामुळे बिहारमधील "यादव फॅमिली' सोशल मीडियामध्ये भलतीच चर्चेत आली होती. लालूंप्रमाणेच अन्य पक्षांचे नेतेही सोशल मीडियावर विशेष सक्रिय असल्याचे दिसून येते. राज्यातील 1 हजार 300 कोटी रुपयांचा "सृजन' गैरव्यवहार उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधण्याऐवजी थेट ट्‌विटर हॅंडलचा आधार घेतला होता. पुढे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केलेला टिवटिवाट विशेष चर्चेचा विषय ठरला होता. पण, या सगळ्यांमध्ये लालूंचा बिनधास्त अंदाज सर्वांनाच भारी पडल्याचे दिसून येते.