काश्मीरमध्ये मुफ्ती सरकार का कोसळलं?

 Bjp Pulls Out Support From Pdp In Jammu Kahsmir
Bjp Pulls Out Support From Pdp In Jammu Kahsmir

नवी दिल्ली - भाजपाने आज(मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपर्यंत जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील. भाजपानेही सरकारचे समर्थन मागे घेतल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. 

राजकीयदृष्ट्या खळबळ माजवणारी ही गोष्ट आहे. एकमेकांच्यात विरोधाभास असतानासुद्धा पीडीपी आणि भाजपने तीन वर्षापूर्वी सत्ता स्थापन केली होती. ही युती करताना खरं तर जम्मू काश्मीरला चांगले दिवस येतील असे एकंदरीत चित्र रंगवण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे होताना दिसले नाही. जम्मू काश्मीरचा विकास तर झालाच नाही, उलट दहशतवाद्यांच्या कारवाया वाढतच गेल्या. परिणामी भाजप आणि पीडीपीच्या नेत्यातील विसंवाद वाढत गेला.

बुखारींसारखे संपादक मारले जातात, औरंगजेब सारख्या भारतीय शिपायाची हत्या होते. यामुळे जनतेत नाराजी पसरत होती आणि याच नाराजीचा अंदाज भाजप नेत्यांना आला होता. आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही काश्मीरप्रश्न चुटकीसरशी सोडवतो, हे भाजप नेत्यांचे बोलणे चुकीचे ठरत होते. तिथल्या कुठल्याही समस्या सोडवण्यात भाजपला यश येत नव्हते. याचा भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला असता, याच कारणामुंळे भाजपने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

2019 लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी म्हणून भाजपने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. पीडीपीला अन्य कुठलाही पक्ष सरकार स्थापनेसाठी पाठींबा देणार नाही हे लक्षात घेऊनच भाजपने हा निर्णय सरकारने घेतला असल्याचे बोलले जात आहे.

जम्मू काश्मीरमधील सध्याचे पक्षीय बलाबल
एकूण जागा - 87
नामनिर्देशिक - 2
पीडीपी - 28
भाजप - 25
काँग्रेस - 12
नॅशनल कॉन्फरन्स - 15
पिपल्स कॉन्फरन्स - 2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com