पश्‍चिम बंगालमध्ये भाजपची निदर्शने 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

कोलकता - पंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने धरणे आंदोलन सुरू केले आहे. मायो रोड भागात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यानजीक भाजप नेते मुकुल रॉय यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. इतर पक्षांतील कोणत्याही उमेदवाराने निवडणूक अर्ज भरू नये, असे प्रयत्न सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. दरम्यान, या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी येथे राखीव दले तैनात करावीत, अशी मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. 

Web Title: BJP's demonstrations in West Bengal