आमचा पक्ष दलितांचा नव्हे, तर सर्वांचा : बसप

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे.
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्ष जातीच्या नावावर मत मागत असल्याने त्यांना निवडणूक लढण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाज पक्ष हा दलितांचा पक्ष नसून हा असा एक पक्ष आहे की जेथे सर्वजण एकाच छताखाली आले आहेत, असे स्पष्टीकरण बसपने दिले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना बसप नेते सुधींद्र भदौरिया म्हणाले, 'आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, आमचा पक्ष म्हणजे दलितांचा पक्ष नव्हे. तर मुस्लिम, इतर मागासवर्गीय, उच्च जाती आणि इतर समुदाय अशा सर्वांना एकाच छताखाली आणणारा पक्ष आहे.' यावेळी भाजपवरच टीका करत भदौरिया म्हणाले, 'भाजप धर्मावर आधारित राजकारण करत आहे. त्यांनीच राम मंदिराची घोषणा दिली. 'राम जादा' आणि अन्य प्रकारचे "जादा' असल्याचे त्यांचेच म्हणणे आहे. त्यांचे नेते काय म्हणतात? साक्षी महाराज काय म्हणतात? ते म्हणतात की एकच धार्मिक समुदाय आहे की ज्यांची लोकसंख्या वाढत आहे? जनरल व्हीके सिंह काय म्हणतात? साध्वी निरंजन काय म्हणतात?' असे प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केले.

'आमच्या पक्षात सर्वांना समान न्याय, प्रतिष्ठा आणि सर्वांचे सक्षमीकरण करण्यात येते. म्हणूनच आम्ही मुस्लिम, दलित, इतर मागासवर्गीय आणि उच्च जातीच्या लोकांना तिकिटे दिली आहेत', असेही ते पुढे म्हणाले.