पोटनिवडणुका भाजपसाठी 'अपशकूनी'

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

या सर्व पोटनिवडणुकांचे निकाल 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानले जात आहे. विरोधी पक्षांकडून तिसरी आघाडी करण्याबाबत हालचालही केली जात आहे. या तिसऱ्या आघाडीचा परिणाम उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पाहिला मिळाला.

नवी दिल्ली : आत्तापर्यंत झालेल्या पोटनिवडणुका भाजपसाठी अपशकूनी ठरल्या असल्याचे निर्देशनास आले आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची रणनीति कामी येत आहे. मात्र, पोटनिवडणुकात या जोडगोळीची रणनीति कामी येत नसल्याचे दिसत आहे. मागील चार वर्षांमध्ये ज्या चार राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला सपशेल अपयश आले आणि दारुण पराभव झाला. 

उत्तरप्रदेशात भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जागेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा करिष्माही दिसला नाही. उत्तरप्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर या भाजपच्या लोकसभेच्या जागाही भाजपला जिंकता आल्या नाहीत. इतकेच नाहीतर आज (गुरुवार) लागलेल्या पोटनिवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. मात्र, या पोटनिवडणुकांमध्येही भाजपला यश मिळत नसून, भाजप पिछाडीवर आहे. या निकालानंतर भाजप पुन्हा एकदा आपल्या जागेवर पराभव होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया, पालघर, उत्तरप्रदेशातील कैराना आणि नागालँडच्या पोटनिडणुकात भाजपचा पराभव होताना दिसत आहे. या मतमोजणीदरम्यान भाजप पिछाडीवर असल्याचा समोर आले आहे.

दरम्यान, या सर्व पोटनिवडणुकांचे निकाल 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानले जात आहे. विरोधी पक्षांकडून तिसरी आघाडी करण्याबाबत हालचालही केली जात आहे. या तिसऱ्या आघाडीचा परिणाम उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पाहिला मिळाला.  

Web Title: Bypoll Election not lucky for BJP