तुझा पाय तोडेन ; केंद्रीय मंत्र्यांची दिव्यांगाला धमकी

Can Break Your Leg Says Babul Supriyo At Event For Differently Abled
Can Break Your Leg Says Babul Supriyo At Event For Differently Abled

नवी दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांचे भाषण सुरु असताना एक दिव्यांग व्यक्ती व्यासपीठासमोर वारंवार येत होती. त्यामुळे संतापलेल्या मंत्रिमहोदयांनी या दिव्यांग व्यक्तीला थेट पाय तोडण्याची धमकीच दिली. याबाबतचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

आसनसोल येथे दिव्यांगांसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दिव्यांगांना व्हिलचेअर आणि अन्य आवश्यक साहित्यांचे वितरण केले जाणार होते. या कार्यक्रमात सुप्रियो यांचे भाषण सुरु झाल्यानंतर उपस्थितांपैकी खाली लोकांमध्ये बसलेली एक दिव्यांग व्यक्ती वारंवार मंचासमोरुन जात होती. तेव्हा सुप्रियो यांनी त्या व्यक्तीला ''तुम्ही का हालचाल करत आहात ? कृपया खाली बसा'', असे सांगितले होते. मात्र, त्या व्यक्तीची हालचाल थांबत नव्हती. अखेर संतापलेल्या सुप्रियो यांचा पारा चांगलाच चढला. या संतापाच्या भरात सुप्रियो यांनी ''तुला काही अडचण आहे का ? तुला काय झाले ? मी तुझे पाय तोडेन आणि तुला कुबडी देईन'', अशी थेट धमकीच त्या दिव्यांग व्यक्तीला दिली. 

दरम्यान, यापूर्वी बाबूल सुप्रियो यांनी राम नवमी उत्सवातही बेशिस्त भाविकांवर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता या दिव्यांग व्यक्तीवर त्यांनी संताप व्यक्त करत धमकी देणारे वक्तव्य केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com