बेपत्ता विद्यार्थी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे

पीटीआय
बुधवार, 17 मे 2017

उच्च न्यायालयाने चौकशीसंदर्भात दिलेल्या निर्देशाबाबत आपल्याला कोणतीही तक्रार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी या वेळी स्पष्ट केले. न्यायालयाने म्हटले, की नजीबच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात येईल आणि हा अधिकारी डीआयजी श्रेणीपेक्षा कमी दर्जाचा नसावा

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमद प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली. नजीब हा ऑक्‍टोबर 2016 पासून बेपत्ता आहे. न्यायधीश जीएस. सिस्तानी आणि रेखा पाली यांच्या पीठाने विद्यार्थ्याच्या पालकाने दाखल केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.

उच्च न्यायालयाने चौकशीसंदर्भात दिलेल्या निर्देशाबाबत आपल्याला कोणतीही तक्रार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी या वेळी स्पष्ट केले. न्यायालयाने म्हटले, की नजीबच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात येईल आणि हा अधिकारी डीआयजी श्रेणीपेक्षा कमी दर्जाचा नसावा. या प्रकरणाला सीबीआयकडे सोपवताना न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून न्यायालयात सादर केलेली सर्व माहिती आणि अहवालाचे पालन केले असल्याचे नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे.

Web Title: CBI to search for JNU student