PoK तील नागरिकांना अधिकाधिक मदत करावी- सेना

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

मुंबई - पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयांच्या प्रयत्नांचे कौतुक करत पाकव्याप्त काश्‍मिरमधील नागरिकांना केंद्र सरकारने अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन शिवसेनेने केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, "पाकव्याप्त काश्‍मिरमधील लोक आनंदी असल्याचा दावा पाकिस्तान सरकार वेळोवेळी करत आहे, ही फार मोठी बाब आहे. अशाच प्रकारचे चित्र ते संयुक्त राष्ट्रासह काश्‍मिरमधील नागरिकांसमोर उभे करत आहेत. मात्र तेथील स्थानिक नागरिक खुलेपणाने जे सांगत आहेत त्यावरून तेथे मानवी हक्कांचा भंग होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड झाला असून हा भारताच्या लोकशाहीचा विजय आहे.‘ तसेच "त्यामुळे केंद्र सरकारने पाकव्याप्त काश्‍मिरमधील नागरिकांना अधिकाधिक मदत करावी‘, असेही राऊत पुढे म्हणाले.

"दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांमुळे येथे जगणे म्हणजे नरकासमान झाले आहे‘, असे म्हणत पाकव्याप्त काश्‍मिरमधील कोटी, चिनारी, मिरपूर, गिलगिट, दियामेर आणि निलम परिसरातील स्थानिक नागरिकांनी आज रस्त्यावर येत आपल्या भावना व्यक्त केल्या.