छत्तीसगडमध्ये बॉम्ब स्फोटात जवान हुतात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

रायपूर (छत्तीसगड)- नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी आज (बुधवार) सकाळी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात एक जवान हुतात्मा तर दोघे जण जखमी झाले आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका रस्त्याच्या कामाचे शुभारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर जवान निघाले होते. यावेळी माओवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. स्फोटात पुराण पोताई हे हुतात्मा झाले तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, जवानांनी परिसर ताब्यात घेतला असून, माओवाद्यांविरोधात शोध मोहिम हाती घेतली आहे.