तमिळनाडू: आरोग्य मंत्र्याच्या निवासस्थानी प्राप्तीकर विभागाचा छापा

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

चेन्नईचे आरोग्यमंत्री सी. विजया भास्कर यांच्या पुद्दुकोट्टाई येथील निवासस्थानी आज (बुधवार) प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.

चेन्नई : चेन्नईचे आरोग्यमंत्री सी. विजया भास्कर यांच्या पुद्दुकोट्टाई येथील निवासस्थानी आज (बुधवार) प्राप्तिकर विभागाने छापा टाकला.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर आरके नगर या त्यांच्या मतदारसंघात बारा एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भास्कर यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. चेन्नईसह इतर ठिकाणच्या त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानावरून पैसे वाटल्याचा आरोप आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन मे रोजी भास्कर यांच्या पत्नीला प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविली होती. या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभागाने आज त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. 'सर्व प्रकारचे सहकार्य करत असूनही प्राप्तिकर विभाग त्रास देत आहे', असा आरोप भास्कर यांनी केला.

या छाप्याशिवाय प्राप्तिकर विभागाने राज्यातील एकूण 23 वेगवेगळ्या ठिकाणीही छापा टाकला आहे. प्राप्तिकर न भरणाऱ्यांवर छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Chennai: IT raids TN Health Minister's residence