कमल हसन यांचे चाहत्यांशी गुफ्तगू

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

चेन्नई, : ज्येष्ठ अभिनेते कमल हसन राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर पकडत असतानाच आता त्यांनी चाहत्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. हसन यांनी चाहत्यांसोबतची चर्चा ही केवळ वाढदिवस आणि सामाजिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कमल हसन वेलफेअर क्‍लबचे ज्येष्ठ सदस्य थंगवेलू म्हणाले, ""कमल हसन यांचा वाढदिवस 7 नोव्हेंबरला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत हसन यांच्याशी चर्चा झाली. तसेच, काही सामाजिक कार्यक्रम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. हसन यांनी सामाजिक उपक्रम वाढविण्यावर आणखी भर देण्यास सांगितले आहे.''
हसन यांनी तमिळनाडूतील अण्णा द्रमुक सरकारच्या कारभारावर सातत्याने ताशेरे ओढले आहेत. राज्यात डेंगीचा प्रसार होण्यास सरकारी भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. हसन यांच्या सरकारवरील टीकेला फार मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यासह सरकारमधील मंत्री हसन यांच्या आरोपांचा प्रतिवाद करताना दिसत आहेत.

वाढदिवशी घोषणेची शक्‍यता
कमल हसन यांचे फॅन क्‍लब नसून, त्याऐवजी त्यांचे चाहते कल्याणकारी संघटना स्थापन करून सामाजिक कार्य करीत आहेत. कमल हसन यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या चाहत्यांची बैठक घेऊन साधलेल्या संवादामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हसन हे वाढदिवशी होणाऱ्या कार्यक्रमात राजकीय प्रवेशाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: chennai news actor kamal hasan and his fans