कमल हसन यांची दिनकरन यांच्यावर टीका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

चेन्नई: तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाला ज्येष्ठ अभिनेता कमल हसन यांनी पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. "रिसॉर्ट'मध्ये आराम करणाऱ्या आमदारांना "काम नाही तर वेतन नाही' हा नियम लागू होत नाही का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

अण्णा द्रमुकमध्ये (अम्मा गट) गटातटाचे राजकारण सुरू असल्याने राज्याचे राजकीय वातावरण सध्या अस्थिर बनले आहे. पक्षाचे नेते टीटीव्ही दिनकरन हे कर्नाटकातील कुर्गमधील आलिशान रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे 19 बंडखोर आमदार आहेत. यावर कमल हसन यांनी "संपावर जाणाऱ्या शिक्षकांना "काम नाही तर वेतन नाही,' असा इशारा न्यायालयाने दिला आहे. मग कामाऐवजी रिसॉर्टमध्ये आराम करीत घोडेबाजार करणाऱ्या राजकीय नेत्यांना हा नियम लागू का होऊ नये?, असा सवाल ट्विटरवर केला आहे.

कमल हसन यांनी नवी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे नुकतेच एका मुलाखतीत सूचित केले होते. तमिळनाडूतील स्थानिक निवडणूक लढविण्याची तयारी ते करीत असल्याचे सांगण्यात येते.