तूर्तास राजकारण नाही: रजनीकांत

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात असताना रजनीकांत यांनी मात्र तूर्तास तरी राजकारणामध्ये प्रवेश करण्याची आपली इच्छा नसल्याचे म्हटले आहे. येथे विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा खुलासा केला. पुढील महिन्यामध्ये रजनीकांत यांचा वाढदिवस (12 डिसेंबर) असून, त्या दिवशी ते आपल्या चाहत्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

तत्पूर्वी रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले होते. यावरून त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चेला ऊत आला होता. रजनीकांत यांच्याप्रमाणाचे राजकीय प्रवेशाची चाचपणी करणाऱ्या कमल हसन यांनीही त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रजनीकांत राजकारणात येणार असतील तर आपण त्यांच्यासोबत काम करू, असे विधान कमल हसन यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

चढ्या व्याजावर हसन यांची टीका
अभिनेते कमल हसन यांनी आज आर्थिक विषयावर आपली मते मांडताना चढ्या दराने आकारल्या जाणाऱ्या व्याजावर टीका केली. या अवाजवी व्याजामुळे शेतकरी आणि चित्रपट उद्योगाला मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तमिळी चित्रपट निर्माते अशोककुमार यांनी फायनान्सरच्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या घटनेवर भाष्य करताना कमल हसन म्हणाले की, ""कायदा आणि चित्रपट क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घेत अवाजवी व्याजाची प्रथाच संपुष्टात आणायला हवी.'' अशोककुमार यांच्या आत्महत्येवर तमिळ चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेनेही दु:ख व्यक्त केले आहे.

Web Title: chennai news No Politics Soon: Rajinikanth