शशिकलांच्या घरी व कार्यालयावर सलग तिसऱ्या दिवशी छापे

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

चेन्नई : ऑपरेशन क्‍लीन मनी अंतर्गत प्राप्तिकर विभागाने एआयएडीएमकेच्या नेत्या शशिकला यांच्या घरी व कार्यालयावर सलग तिसऱ्या दिवशी छापे टाकले. नोटाबंदीनंतर शेल कंपन्या व करचुकवेगिरी करणाऱ्यांना प्राप्तिकर विभागाने लक्ष्य करीत छापासत्र सुरू ठेवले. यामध्ये जय टीव्हीचाही समावेश आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार शशिकला यांची संपत्ती केवळ कागदोपत्री असून, शेल कंपन्यांच्या नावे त्यांनी अनेक मालमत्ता स्वत:च्या नावे करून घेतल्या आहेत. ही संपत्ती 150 कोटी रुपयांच्या घरात असून, ही सर्व संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: chennai news Raids on shashikala's home and office