छत्तीसगढमध्ये माओवाद्यांच्या स्फोटात बालक ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

कंकेर (छत्तीसगढ) - माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

कंकेर जिल्ह्यात माओवाद्यांचा प्रभाव वाढत आहे. जिल्ह्यातील अनंतगड गावात माओवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यामध्ये एका बालकाचा मृत्यू झाला. अलिकडेच 4 एप्रिल रोजी माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात एका पोलिस कर्मचाऱ्यासह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान छत्तीसगढमधील सुकमा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) सापडलेली दोन किलोग्रॅम स्फोटके (आयईडी) निष्क्रिय करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पोलमपल्ली येथे सीआरपीएफच्या 223 बटालियने स्फोटके निष्क्रिय केली. या शोधमोहिमेदरम्यान तपासात मदत करणाऱ्या श्‍वानाला साप चावला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.